मायावतींना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार

18
mayavati

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रचार सभेमधील वादग्रस्त विधानांमुळे निवडणूक आयोगाकडून प्रचार बंदी आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिलासा मिळालेला नाही. निवडणूक प्रचारात जाती-धर्माच्या आधारे मते मागत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मायावती यांना निवडणूक आयोगाने दोन दिवसांसाठी प्रचारबंदी घातल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत.

मायावती यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने साफ नकार दिला. सुनावणीस नकार देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांचा वापर केला आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवरच आयोग कारवाई करत आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मायावतींवर आजपासून 48 तासांसाठी प्रचारबंदी करण्यात आली आहे. या दरम्यान, मायावती यांनी सभेसाठी परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मायावतींना सभा गुंढाळावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या