तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला लोकसभेची मंजुरी

triple-talaq

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुस्लिम महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली आहे. आवाजी मतदानाने विधेयकाला मंजुरी मिळाली.

मुस्लिम कुटुंबांमध्ये पतीकडून महिला आणि मुलांच्या भवितव्याची ठोस तरतूद न करता फक्त तलाक तलाक तलाक असे लेखी अथवा तोंडी स्वरुपात ३ वेळा सांगून तलाक देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणार होतात. यामुळे अनेक मुस्लिम महिला आणि मुले निराधार होतात आणि त्यांचे भवितव्य संकटात सापडते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधी विधेयक संसदेत सादर केले आहे. या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली आहे. आता राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मांडले, विरोधकांचा थयथयाट

तलाकबंदीची अग्निपरीक्षा

तिहेरी तलाक आता फौजदारी गुन्हा

तिहेरी तलाक देणे हा गुन्हा

तिहेरी तलाकविरोधी विधेयकानुसार तलाक तलाक तलाक असे लेखी अथवा तोंडी स्वरुपात ३ वेळा सांगून तलाक देणे हा गुन्हा होणार आहे. जर कोणी तिहेरी तलाक दिला तर तलाक देणाऱ्यास तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद विधेयकात आहे.

दुरुस्तीचे प्रस्ताव फेटाळले

विरोधकांनी तिहेरी तलाकविरोधी विधेयकात दुरुस्ती सुचवणारे काही प्रस्ताव सादर केले होते. हे प्रस्ताव बहुमताच्या जोरावर फेटाळण्यात आले. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सादर केलेला दुरुस्तीचा प्रस्ताव २ विरुद्ध २४१ मतांनी फेटाळण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या