टी-२० मध्ये हिट विकेट होणारा लोकेश पहिला हिंदुस्थानी

2

सामना ऑनलाईन । कोलंबो

लोकेश राहुल टी- २० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. जीवन मेंडिसच्या गोलंदाजीवर लोकेशचा पाय यष्टीला लागला आणि या नकोशा ‘विक्रमा’ची नोंद त्याच्या नावावर झाली.

निदाहास चषक तिरंगी टी- २० क्रिकेट स्पर्धेत सोमवारी श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत हे नाटय घडले. रिषभ पंतच्या जागी संघात स्थान मिळालेला लोकेश राहुल जबाबदारीने फलंदाजी करीत होता. मात्र १८ धावांवर खेळत असताना मेंडिसच्या गोलंदाजीवर त्याचा पाय यष्टीला लागला. हिट विकेट झाल्याने लोकेश माघारी परतला. टी- २० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा तो पहिला हिंदुस्थानी तर क्रिकेटविश्वातील नववा फलंदाज ठरला. या यादीत एबी डिक्हिलियर्स, श्रीलंकेचा दिनेश चंडिमल, पाकिस्तानचा मिसबाह उल हक, मोहम्मद हाफीज यांचा समावेश आहे. कसोटीत हिट विकेट होणारे लाला अमरनाथ हे पहिले हिंदुस्थानी फलंदाज ठरले होते. १९४९ मध्ये ते हिट विकेट झाले होते. तर एकदिवसीय सामन्यात नयन मोंगिया (१९९५) हिट विकेट होणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला होता.

आपली प्रतिक्रिया द्या