… तरीही वर्ल्ड कप आमचाच-बेन स्टोक्सला विश्वास

21

सामना ऑनलाईन। लॉर्डस्

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंड संघाला जेतेपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र याच इंग्लंडला साखळी फेरीत तीन पराभवाचे धक्के बसल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान आता धोक्यात आले आहे. तरीही यंदाचा विश्वचषक आम्हीच जिंकू, असा विश्वास इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने व्यक्त केला.

इंग्लंडला पाकिस्तानने पराभवाचा धक्का दिल्यानंतर श्रीलंकेकडूनही त्यांना अनपेक्षितपणे पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. आता उर्वरित दोन साखळी लढतीत त्यांच्यापुढे हिंदुस्थान व न्यूझीलंड या तगडय़ा संघांचे आव्हान आहे. त्यामुळे इंग्लंडची उपांत्य फेरीची वाटचाल आता खडतर बनली आहे. मात्र तरीही इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला कर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या