सामना सुरू असताना मैदानावरून विमान उडणार नाही- इंग्लंड क्रिकेट बोर्ड

40

सामना ऑनलाईन। मँचेस्टर

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानचा सामना सुरू असताना मैदानावरून एकही विमान उडणार नाही, अशी ग्वाही इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने ‘बीसीसीआय’ला दिली. सामन्यादरम्यान मैदानावर ‘नो फ्लाइंग झोन’ जाहीर करण्यात आला.

शनिवारी हिंदुस्थान आणि श्रीलंकादरम्यान सामना सुरू असताना एक विमान मैदानावरून गेले. या विमानाकर ‘जस्टिस फॉर कश्मीर’ असे लिहिण्यात आले होते. त्यानंतर दुसऱयांदा एक हेलिकॉप्टर मैदानावरून गेले आणि त्यावर ‘इंडिया स्टॉप गेनोसाइड अँड फ्री कश्मीर’ म्हणजेच ‘हिंदुस्थानने कश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे’ अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी पाकिस्तान- अफगाणिस्तान सामन्यादरम्यानही असेच अनधिकृत विमान मैदानावरून गेले. या विमानावर ‘जस्टिस फॉर बलुचिस्तान’ हे शब्द मोठय़ा अक्षरांत लिहिले गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या