हिंदुस्थानची लढत बेभरवशी विंडीजशी

16

सामना ऑनलाईन । मँचेस्टर

चार विजय मिळवणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाला आज वर्ल्ड कपमधल्या लढतीत वेस्ट इंडीजचा सामना करावयाचा आहे. यावेळी उपांत्य फेरीकडे वाटचाल करण्यासाठी विराट सेना सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. मात्र चार पराभवांनिशी अवघ्या तीन गुणांची कमाई करणाऱया विंडीजला कमी लेखून चालणार नाही. जेसन होल्डरची सेना टीम इंडियाला पराभवाचा धक्का देण्याची क्षमता बाळगून आहे. याच पार्श्वभूमीवर दोन संघांमध्ये तुल्यबळ लढत रंगेल.

धोनीवर लक्ष

महेंद्रसिंह धोनीने अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत संथ फलंदाजी केली. त्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या फलंदाजीवर टीका केली. आता हिंदुस्थानी संघव्यवस्थापनासमोर धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे. विजय शंकरला संघात कायम ठेवायचे की रिषभ पंतला संधी द्यायची याबाबतही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत टीम इंडिया कोणत्या योजनेसह मैदानात उतरतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या