तिरंग्याचा अपमान करणाऱ्या पाकड्यांना भिडली हिंदुस्थानी महिला पत्रकार

सोशल मीडियावर सध्या लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तिरंग्याचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांना एक हिंदुस्थानी महिला भिडल्याचे दिसत आहे. पूनम जोशी असे या महिलेचे नाव असून ती पत्रकार आहे. पूनमने दाखवलेल्या या धाडसाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

15 ऑगस्टला लंडनमध्ये हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयाबाहेर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत होता. यावेळी तिरंगा फडकावताच तेथे पाकिस्तानी व खलिस्तानी समर्थक जमा झाले व त्यांनी हिंदुस्थानविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच एका बुरखाधारी महिलेने व अन्य एका व्यक्तीने तिरंगा जमिनीवर फेकला व पायदळी तुडवला. तिरंग्याचा अपमान होत असल्याचे बघून पत्रकार पूनम गर्दीतून पुढे आली व पाकड्यांना भिडली. तिने त्यांच्या हातातून तिरंगाही खेचून घेतला. पूनम तेथे रिपोर्टींगसाठी गेली होती. पण तिरंग्याचा अपमान तिला सहन झाला नाही. पूनमच्या या बहादुरीचे कौतुक होत असून तिला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. तर एकाने ‘हिंदुस्थानी नारी आतंकवाद्यांवर भारी’ असे पोस्ट करत तिला सलाम केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या