प्रेमाला सीमा नसते… लंडनचं वऱ्हाड आलं संभाजीनगरला

प्रेमाला सीमा नसते…’ असे म्हणतात, याचाच प्रत्यय संभाजीनगरमधील नागरिकांना आला आहे. जातीपातीच्या भिंती तोडून लंडनचा एडवर्ड आणि संभाजीनगरची सांची रगडे हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. या लग्नामुळे एका ब्रिटिश आणि हिंदुस्थानी कुटुंबाची नाळ घट्ट जोडली गेली.

2019 पासून एडवर्ड आणि सांची इंग्लंडमध्ये सोबत होते. तीन वर्षांनी त्यांनी लग्नाबाबत घरी सांगितले आणि घरच्यांनी देखील लग्नासाठी होकार दिला. सांचीच्या घरातल्यांची अट मात्र एकच होती, ती म्हणजे लग्न संभाजीनगरमध्ये व्हावे तेदेखील बौद्ध पद्धतीने. एडकर्डच्या कुटुंबाने होकार दिला अन् लंडनचं वऱ्हाड थेट संभाजीनगरमध्ये दाखल
झालं. लग्नाची करात धूमधडाक्यात निघाली. ज्यात दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र ताल
धरला. एडकर्डसह त्याच्या कुटुंबीयांनी सर्व विधीत सहभाग घेतला.

सांची आता सातासमुद्रापार राहायला जाणार याचे दुःख आहे, परंतु एका चांगल्या कुटुंबात तिचा विवाह झाला याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया रगडे कुटुंबीयांनी दिली.