बॉयफ्रेंडबरोबर नाईट आऊटला जाण्यासाठी मुलांना घरात कोंडणाऱ्या महिलेला शिक्षा

1249

तीन मुलांना घरात कोंडून बॉयफ्रेंडबरोबर नाईट आऊटला जाणे इंग्लडमधील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या 32 वर्षीय महिलेला इंग्लडमधील न्यायालयाने निष्काळजीपणाबरोबरच बेजबाबदार वर्तणूकीसाठी दोषी ठरवले असून 18 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना इंग्लडमधील लँकेशायर येथे 15 सप्टेंबर 2017 साली घडली होती. त्यावर न्यायालयाने आता निकाल दिला आहे.

डेली मेलने याबद्दल माहिती दिली आहे. संबंधित महिलेला तीन मुलं असून ती घटस्फोटीता आहे. 15 सप्टेंबर 2017 मध्ये तिला बॉयफ्रेंडबरोबर एक रात्र हॉटेलमध्ये घालवायची होती. पण तीन मुलं घरात असल्याने त्यांना  घरात एकटे सोडून तिला जाता येणे शक्य नव्हते. यामुळे तिने बहिणीला मुलांची काळजी घेण्याची विनंती केली. पण तिलाही शक्य झाले नाही. यामुळे महिलेने मुलांना घरात एकटे सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने मुलांसाठी जेवणही बनवून ठेवले व बाथ्रूममध्ये टॉयलेट पेपर आणि एक बादली ठेवली. त्यानंतर सात वर्षाच्या मोठ्या मुलाला सूचना देऊन ती बॉयफ्रेंडकडे निघून गेली.

यादरम्यान, तिच्या पहिल्या पतीने मुलांची विचारपूस करण्यासाठी घरी फोन केला. त्यावेळी मुलं घरात एकटीच असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने ताबडतोब पोलिसांना कळवले. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. विशेष म्हणजे ज्या दिवशी ती बाहेर गेली त्याच दिवशी तिच्या मोठया मुलाचा वाढदिवस होता. न्यायालयाने याची विशेष दखल घेत तिच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर न्यायालयाने आता निकाल दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या