नाईटक्लबमध्ये भेटीनंतर सहाव्या मिनिटाला बलात्कार, घटना सीसीटीव्हीत कैद

2849

लंडनमधील नाईटक्लबमध्ये घडलेला संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाईटक्लबमध्ये एका महिलेची भेट झालेल्या दोन श्रीमंत विद्यार्थ्यांनी सहाव्या मिनिटाला तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलगी नशेमध्ये असल्याचा फायदा नराधमांनी घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी ब्रिटीश न्यायालयाने दोन्ही आरोपींना 15 ऑक्टोबरला दोषी ठरवले.

महिलेवरील अत्याचाराचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर याला वाचा फुटली. नाईटक्लबमधील सीसीटीव्हीमध्ये दोषी फर्डिनान्डो ओरलान्डो (25) आणि लॉरेन्जो कोस्टान्जो (26) हे दोन विद्यार्थी डान्स फ्लोअरवर महिलेची भेट घेताना आणि सेलिब्रेशन करताना दिसत आहे. महिलेच्या भेटीनंतर ती नशेमध्ये असल्याचा फायदा उठवत दोघांनी तिला मेंटेनन्स रुममध्ये नेले आणि सामूहिक बलात्कार केला.

विद्यार्थ्यांनी या दुष्कृत्यानंतर महिलेचे कपडे बदलले आणि तिला टॉयलेटमध्ये फेकून फरार झाले. बलात्कारामुळे महिलेले गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवली. दोन्ही विद्यार्थी ओरलान्डोतील इंटरनॅशनल लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत. दोघे बिझनेस आणि मॅनेजमेंटची मास्टर डिग्री घेत होते.

accused

दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी लंडनमधील सर्वात महागडे वकील आपल्या बचावासाठी नेमले. न्यायालयात विद्यार्थ्यांनी सेक्ससाठी महिलेची सहमती होती, असे सांगितले. परंतु न्यायालयाने त्यांची साक्ष अमान्य करत दोघांनाही दोषी ठरवले. 15 ऑक्टोबरला न्यायालयाने दोघांनी दोषी ठरवले असून शिक्षेची सुनावणी नंतर करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या