शास्त्रज्ञांनी शोधली आणखी एक पृथ्वी

2292

पृथ्वीप्रमाणेच वातावरण असलेल्या आणखी एका ग्रहाचा शोध गेली अनेक वर्षे जगभरातील संशोधक घेत आहेत. असे अनेक ग्रह मिळालेही, मात्र त्यावर पाण्यापेक्षा गॅसच मोठ्या प्रमाणावर आढळल्याने तेथे मनुष्य जीवन तग धरणे शक्य नाही. मात्र लंडनमधील काही संशोधकांनी एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे ज्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी असण्याची दाट शक्यता आहे. पाणी असेल तर तेथे जीवसृष्टीही असू शकते.

शास्त्रज्ञांनी याबाबत बोलताना सांगितले की, आपल्या सूर्यमालेच्या बाहेर पृथ्वीसारखाच एक ग्रह सापडला आहे. त्या ग्रहाच्या वातावरणात पाणी असल्याचे स्पष्ट झाले असून तो बहुतांश पृथ्वीप्रमाणेच आहे. पृथ्वीपासून हा नवा ग्रह 100 प्रकाशवर्षे दूर असून आपल्या सूर्यासारख्याच एका ग्रहाभोवती तो फिरत आहे. पृथ्वीच्या तुलनेत त्याचे वजन आठ पटीने जास्त आहे. ‘के2-18बी’ असे नाव असलेल्या या ग्रहावर जीवसृष्टी तग धरू शकेल अशी परिस्थती आहे. नॅशनल ऍस्ट्रॉनॉमी नावाच्या जर्नलमध्ये आलेल्या वृत्तानुसार या ग्रहावर पाणी असण्याची शक्यता आहे.

सपाट पृष्ठभूमी असलेला ग्रह

पृथ्वीप्रमाणे असलेले आतापर्यंत 4 हजार ग्रह शोधण्यात आले आहेत, पण त्या सगळ्यात हा एकमेव ग्रह असा आहे ज्याची पृष्ठभूमी सपाट आहे आणि त्याच्या वातावरणात पाणी असल्याची शक्यता शास्त्रज्ञांना जाणवली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे शास्त्राज्ञ जियोवाना टिनेटी यांनी सांगितले की, आपल्या सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या या ग्रहावर मनुष्याला राहण्याची अनुकूल परिस्थिती आहे. मात्र या ग्रहावर समुद्र आहेत की नाही हे मात्र आत्ता लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा ग्रह इतक्या दूर अंतरावर आहे की त्या ग्रहापर्यंत आपण जाऊ शकणार नाही, असेही जर्नलमधील लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या