बहिणीने दिला भावाच्या बाळाला जन्म

सामना ऑनलाईन। लंडन

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे. असे म्हटलं जात. असचं काहीस इंग्लडमध्ये घडल्याचे समोर आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समलैंगिक रिलेशिनशिपमध्ये राहणाऱ्या भावाला पितृत्व लाभावे यासाठी बहिणीने त्याच्या पार्टनरकडून सरोगीसी स्विकारली आणि गोंडस मुलीला जन्म दिला. चॅपेल कूपर (27) असे तिचे नाव आहे.

कुंम्ब्रिया येथे राहणाऱ्या चॅपेल विवाहीत असून तिला एक मुलगीही आहे. चॅपेलचा भाऊ स्कॉट स्टीफेन्स समलैंगिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो मायकल स्मिथ या समलैंगिक पार्टनरबरोबर राहत आहे. दोघांनाही पालकत्वाचे वेध लागले होते. त्यासाठी सरोगेसीचा आधार घ्यावा लागणार होता. पण सरोगेसीसाठी ओळखीतली महिला असावी असा स्कॉटचा हट्ट होता. त्यासाठी त्याने नातेवाईकांनाही मदतीचे आवाहन केले. पण कोणीही पुढे येईना. अखेर त्यांच्या लांबच्या नात्यातील एक महिला सरोगेसीसाठी तयार झाली. पण त्यासाठी तिने जी रक्कम मागितली ती ऐकून स्कॉट आणि मायकल यांना धक्काच बसला. त्यांच्या पालक होण्याच्या आशाच धूसर झाल्या. भावाचे हे दु;ख चॅपेलने अचूक ओळखले व तिने ती सरोगेसीसाठी तयार असल्याचे स्कॉटला सांगितले. बहिणीचे आपल्यावरील प्रेम बघून स्कॉटही सुखावला.

त्यानंतर अनेक वैद्यकिय चाचण्यानंतर स्कॉटच्या पार्टनरचे मायकलचे स्पर्म वापरून चॅपेलला गर्भधारणा झाली. चॅपलने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता चॅपेल मुलीची बायलोजिकल माता आणि आत्याही झाली आहे. बहिणीने दाखवलेल्या या औदार्यामुळे स्कॉट आणि मायकलही भारावले असून त्यांनी चॅपेलचे कोटयवधी उपकार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या