लोणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयातील 36 डॉक्टर, नर्स, व स्टाफला क्वारंटाईन करण्यात आल्याने खळबळ

5435

श्रीरामपुरच्या कोरोनोबाधीत रूग्णाने प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे त्या रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, व त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 36 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.

सदर रूग्ण 4 एप्रिल रोजी प्रवरा रूग्णालयात उपचारासाठी आला होता. तेथे त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर नगरला रेफर करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर व नर्स तसेच इतर स्टाफ व यांच्या संपर्कात आलेले सर्व 36 जणांना आज प्रवरा रूग्णालयाने बनवलेल्या कोविड-19 विलगीकरण कक्षात यांना ठेवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या