फुटबॉल खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे पाहा!- नाना पटोले

33

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी फुटबॉल खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे अधिक लक्ष द्यावे अशा शब्दांत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी फडणवीस सरकारला जोरदार ‘किक’ लगावली.
१७ वर्षांखालील मुलांची जागतिक फुटबॉल स्पर्धा देशात होणार आहे. यानिमित्ताने राज्यात प्रत्येक शाळेत फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले.

या मोहिमेत मुख्यमंत्र्यांसहित सरकारचे अनेक मंत्रीही सामील झाले होते. त्यावर पटोले यांनी निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सरकारने वाढविली आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक आहे. कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या नावावर पैशांची वसुली केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या