कर्जबुडव्या विजय मल्ल्याला तत्काळ हिंदुस्थानकडे सोपवा!

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेला लिकर किंग विजय मल्ल्याला तत्काळ हिंदुस्थानकडे सोपवा, अशी मागणी आज केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजाजू यांनी ब्रिटन सरकारकडे केली. ब्रिटनच्या सुरक्षा आणि आर्थिक गुन्हे विभागाचे मंत्री बेन वेलेस यांच्यासोबत रिजाजू यांची द्विपक्षीय चर्चा झाली. यात त्यांनी मल्ल्या यांच्यावर ब्रिटनच्या वेस्टमिनिस्टर कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीबाबत माहिती घेतली. याबाबतची माहिती रिजाजू यांनी बैठकीनंतर ट्विट करू दिली. यावेळी सायबर सुरक्षा, आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोषींचे प्रत्यार्पण करण्याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या