लॉस एंजेलिसमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू अनेक जण जखमी

अमेरीकेत गोळीबाराचे सत्र सुरुच असून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये एका समारंभात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरी पार्कमध्ये घडली आहे. शनिवारी रात्री या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. गोळीबार मॉन्टेरी पार्कमध्ये आयोजित केलेल्या चायनीज न्यू इयर सेलिब्रेशनच्या ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. मॉन्टेरी पार्क लॉस एंजेलिस शहरापासून लगभग 11 किमी अंतरावर आहे.