जत्रेत चोरीला गेलेलं मंगळसूत्र 22 वर्षांनी मिळालं!

जत्रेत चोरीला गेलेलं अडीच ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र धाराशीवमधील एका महिलेला तब्बल 22 वर्षांनी मिळालं आहे. या मंगळसूत्रासाठी या महिलेनं वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर आता त्यांना न्याय मिळाला आहे. कळंब तालुक्यातील वाकरकाडी येथे शकुंतला शिंदे या 63 वर्षीय शेतकरी महिला राहतात.

ऊसतोडणी करून शकुंतलाबाईंनी 1998 साली अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र बनवले होते. येरमाळ्याच्या जत्रेत त्यांचे हे मंगळसूत्र चोरीला गेले होते. येरमाळा पोलीस चौकीत त्यांनी तक्रार केली होती. तत्कालीन कर्मचाऱयांनी वर्षभरातच गुन्ह्याचा छडा लावला. मंगळसूत्रासह चोरटय़ांना गजाआडही केले. पुढे पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. मात्र तारखा अन् सुनावण्या या न्यायालयीन प्रक्रियेतच हे मंगळसूत्र अडकून पडले.

13 जुलै 2019  ला शकुंतला बाईच्या अडीच ग्रॅम मंगळसुत्राचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीला आले. त्यानंतर कळंब न्यायालयात लोक अदालत झाली. त्यात हे प्रकरण पटलाकर आले. तेव्हा याच लोक अदालतीने फिर्यादी महिलेस मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर नुकतेच शकुंतला शिंदे यांना मंगळसूत्र परत देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या