अद्भुत! अविश्वसनीय!! अकल्पनीय!!! इजिप्तमध्ये सापडले 3400 वर्ष जुने ‘सोन्याचे शहर’

इजिप्तमध्ये तब्बल 3400 वर्ष जुने शहर सापडल्याचा दावा पुरातत्व विभागाने केले आहे. लक्झोर शहरातील नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्याजवळ वाळूच्या ढिगाऱ्याखाली हे सोन्याचे शहर सापडले आहे, अशी घोषणा प्रसिद्ध उत्खननकार झाही हवास यांनी केली आहे. बहुचर्चित फैरो अर्थात राजा तुतनखामून याच्या थडग्यानंतर (वर्ष 1922) हे सर्वात महत्वाचे उत्खनन मानले जात आहे.

प्रसिद्ध उत्खननकार झाही हवास यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत हे ‘सोनेरी शहर’ सापडल्याची घोषणा केली आहे. इजिप्तमधील हे सर्वात पुरातन शहर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लक्झोर शहराच्या प्रसिद्ध किंग्ज व्हॅलीजवळ वाळूखाली हे शहर दबलेले होते. याच ठिकाणी तुतनखामून याचे थडगे सापडले होते. या थडग्यामध्ये 10 किलो सोन्याने बनवण्यात आलेला मुखवटे आणि 5 हजार मौल्यवान कलाकृती देखील मिळाल्या होत्या.

gold-city-new

विशेष म्हणजे या ठिकाणी हे शहर सापडेल याचा अंदाजही कोणाला नव्हता. तुतनखामून याच्या शहागृह मंदिराच्या शोधासाठी 2020 मध्ये येथे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. मात्र या दरम्यान हे ‘सोनेरी शहर’ सापडले.

gold-city-found

पुरातत्व विभागाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या शहाराचे नाव एटन असे असून नववा फैरो अर्थात राजा आमेनहोटेम-3 याने हे शहर वसवले होते. या शहराचा वापर आय आणि तुतनखामून या राजांनीही केला होता.

egypt

दरम्यान, उत्खननामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, अलंकार, रंगीत भांडी, मातीच्या विटा, नाणी सापडली आहेत. तसेच एक बेकरी आणि स्वयंपाकघरही सापडले आहे. या शोधामुळे प्राचीन इजिप्तमधील जीवन कसे होते याची कल्पना येईल असे शोधकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच पूर्ण उत्खनन होण्यास अजून पाच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या