सायन-पनवेल मार्गावर आढळला ‘आधार’च्या अर्जांचा खच

सामना ऑनलाइन । खारघर

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सायन-पनवेल मार्गावर खारघरमधील हिरानंदानी पूल ते कोपर पूल यादरम्यान रस्त्याच्या कडेला आधार कार्डच्या अर्जांचा खच आढळला. या अर्जांसोबत मूळ कागदपत्रंही जोडलेली आढळली आहेत. अर्जांवरील पत्ते कळवा, मुंब्रा, घणसोली, ठाणे, भिवंडी, कल्याण, घाटकोपर या भागातील आहेत. काही अर्जांसोबत भाजप आमदार राम कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची शिफारसपत्रे आढळली आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या