दोन काळातला प्रेमाचा घोळ! पाहा ‘लव्ह आज काल 2’चा ट्रेलर

1011

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लव्ह आज कल 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन काळांमधल्या प्रेमाच्या संकल्पनेचा घोळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली असून ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

लव्ह आज कलच्या पहिल्या भागात दोन काळातल्या दोन पिढ्या दाखवण्यात आल्या होत्या. पण त्याच्या सिक्वलमध्ये मात्र दोन काळांसोबत वयाचे दोन टप्पे दाखवण्यात आले आहेत. एका गावातलं शाळकरी वयातलं प्रेम आणि मोठ्या शहरातलं, करिअर-महत्त्वाकांक्षा यामध्ये दोलायमान होणारं नातं यांवर ‘लव्ह आज कल 2’चा सिक्वल बेतलेला आहे.

मॅडॉक फिल्म्स निर्मित या चित्रपटात कार्तिक आर्यन, सारा अली खान, आरुषी शर्मा, रणदीप हूडा असे कलाकार असणार आहेत. जब वी मेट, रॉकस्टार, लव्ह आज कल, हाय वे, तमाशा यांसारखे चित्रपट देणाऱ्या इम्तियाज अली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहे. ‘लव्ह आज कल 2’ येत्या 14 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या