धक्कादायक…प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी कुटुंबियांना आइसक्रीममधून दिले विष; बहिणीचा मृत्यू

700
file photo

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आणि कुटुंबाची चार एकरची मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी एका तरुणाने कुटुंबियांना आइसक्रीममधून विष देण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोझीकोडच्या कासारगोडच्या वेल्लारीकुंडूमध्ये ही घटना घडली आहे. अल्बिन बेनी असे कुटुंबियांना विष देणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रेयसीशी लग्न करण्यासाठी आणि कुटुंबियांची मालमत्ता मिळवण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली बेनीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबियांना मारण्यासाठी त्याने आइसक्रीममध्ये उंदीर मारण्याचे विष मिसळले होते. विष मिसळलेले आइसक्रीम खाल्ल्यानंतर बेनीचा बहीण अॅनाचा मेरीचा मृत्यू झाला. तर त्यांच्या वडिलांनीही आइसक्रीम घेतले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बेनीच्या आईला बरे वाटत नसल्याने तिने थोडेसे आइसक्रीम घेतले होते. त्यामुळे तिच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाला नाही. बेनीच्या आईची प्रकृती बिघडली नसल्याने या प्रकरणात तिचा हात असल्याचा संशय पोलिसांनी होता, असे सर्कलचे पोलीस अधिकारी प्रेम सदन यांनी सांगितले. मात्र, तिला प्रकृती बरी नसल्याने तिन थोडेसे आइसक्रीम घेतल्याचे स्पष्ट झाले. बेनीच्या आईने त्याला घरातील पाळीब कुत्र्याला आईसक्रीम देण्यास सांगितले होते. मात्र, कुत्र्याचा मृत्यू झाल्यास शेजाऱ्यांना संशय येईल म्हणून त्याने राहिलेले आईसक्रीम फेकून दिले आणि प्लेट स्वच्छ केल्या, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. त्यानंतर बेनीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या