लव्ह लग्न लोचा नागपूरमध्ये तर फ्रेशर्स पोहोचले नाशिकला!

नागपूर – विनयच्या साखपुड्यासाठी ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेची टीम सध्या नागपूरमध्ये आली आहे. शूटिंगच्या निमित्ताने ‘लव्ह लग्न लोचा’ची टीम नागपूरमध्ये फूल टू धमाल करत आहे. सर्वच कलाकार नागपूरमध्ये लाँग ड्राइव्ह एन्जॉय करत आहेत. आता नागपूरमध्ये पुढे काय घडते? विनयचा साखरपुडा होतो की नाही? अशी सगळी धमाल अनुभवण्यासाठी झी युवा वाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता ‘लव्ह लग्न लोचा’ मालिका बघायलाच हवी.

फ्रेशर्स मालिकेची टीम सध्या नाशिकला जाण्याचा प्लॅन आखत आहे. आधी सायली आणि नंतर फ्रेशर्सची पूर्ण टीम नाशिकला जाण्याच्या तयारीत आहे. बऱ्याच दिवसांनंतर फ्रेशर्सची टीम कॉलेजच्या सेटवरुन बाहेर पडून निसर्गाचा आणि नाशिककरांचा अनुभव घेणार आहे. फ्रेशर्स नक्की काय करतात ते पाहण्यासाठी झी युवा वाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार रात्री ७:०० वाजता ही मालिका बघावी लागेल.