भिवंडी : लव्ह मॅरेजसाठी तरुणीनी प्रियकरासोबत स्वतःचे घर लुटले

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तरूणीने स्वतःचे घर लुटून पोबारा केल्याची फिल्मी स्टाइल घटना भिवंडीत समोर आली. तब्बल 13 लाखांच्या सोन्याचे दागिन्यांवर या जोडगोळीने डल्ला मारला होता. मात्र पोलिसांनी शिताफीने प्रियकरासोबत त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाची मास्टरमाइंड असलेल्या तरुणीवर देखील गुन्हा दाखल केला जाणार असून तिची अटक अटळ आहे.

फसव्या ऑक्सी पल्स मीटरबाबतच्या व्हायरल मेसेजपासून सावधान, महाराष्ट्र सायबरचे आवाहन

भिवंडीतील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डींग मधील फ्लॅटमध्ये मुख्य दरवाजाचे लॉक बनावट चावीने घरातील कपाटासह किचनमधील 13 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती.

World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

या चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे, हवालदार सोनवणे, सातपुते सोनगिरे, बंडगर, शिरसाठ, ताटे या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तपासादरम्यान तक्रारदारांच्या मुलीकडे प्रकरणाची दिशा वळवली. तिच्याकडे पोलिस पथकाने चौकशी केली असता तिच्या बोलण्यातून विसंगती लक्षात येतात त्यांचा संशय अधिकच बळावला. तिची कसून चौकशी केली असता तिने आपला प्रियकर प्रतीक लाळे-माने (21 वर्ष) आणि त्याचा मित्र हेमंत सौंदाण (21 वर्ष) यांच्यासोबत कट रचून घरीफोडी केल्याची कबुलीच दिली

आपली प्रतिक्रिया द्या