रोहित–जुईलीचे ‘सुरू झाले पर्व नवे…’‘हरिओम’ चित्रपटासाठी गायले प्रेमगीत

स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्माला आलेल्या दोन वीर बंधू मावळ्यांची कथा म्हणजेच ‘हरिओम’. 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱया या चित्रपटातील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘सुरु झाले पर्व नवे’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आवाजाची जोड लाभली आहे. या गाण्याला निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे मुख्य भूमिकेत आहेत.