लग्नाला विरोध केला म्हणून मुलीच्या वडिलांचा प्रियकराने केला खून

141
murder

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे घारपुरीवाडी येथे गुरुवारी रात्री दोन वर्षांपूर्वी दिलेले 10 हजार रुपये परत केले नाहीत आणि लग्नाला नकार दिला म्हणून मुलीच्या वडिलांची गोळया घालून निर्घूण हत्या करण्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला काही तासातच जेरबंद केले असून त्याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वेतोशी गावात राहणारे भिकाजी कृष्णा कांबळे वय 43 हे गुरुवारी रात्री घरी निघाले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती कळताच यंत्रणा कामाला लागली आणि पोलिसांना संशयीत आरोपी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आढळला. तो मुंबईत पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.

आरोपी ऋषिकेश विजय सनगरे, वय 21 याला पोलिसांनी अटक केली. आरोपी ऋषिके सनगरे याचे भिकाजी कृष्णा कांबळे यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच काही वर्षांपूर्वी आरोपी ऋषिकेश सनगरे याने त्यांना दहा हजार रुपये दिले होते. त्यांनी ते पैसे परत केले नाहीत आणि लग्नाला विरोध करत होते या रागातून भिकाजी कृष्णा कांबळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपी ऋषिके सनगरे याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या