कमी खर्चात करा फॅारेन टूर

59
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मार्च-एप्रिल महिना सुरु झाल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते पिकनिकचे. मग बजेटनुसार पिकनिक स्पॉट ठरवले जातात. कधी-कधी कमी बजेटमुळे बऱ्याच जणांना परदेशात जाण्याची इच्छा असूनही जाता येत नाही. पण जगात असेही काही देश आहेत जिथे जाणे सामान्यांच्या बजेटमध्ये आहे. अशाच काही देशांबद्दल जाणून घेऊया..
श्रीलंका…
कमी बजेटमध्ये ज्या देशांमध्ये जाता येते त्यात श्रीलंकेचे नाव आवर्जून घेतले जाते. नोकरी व्यवसायानिमित्त श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानी नागरिक स्थायिक झाले आहेत.यामुळे येथे आल्यावर हिंदुस्थानमध्येच फिरत असल्याचा फिल येतो. तसेच राहण्या-फिरण्याबरोबरच खाण्या-पिण्यासाठीही कमी खर्च येतो. हिंदुस्थानपेक्षा श्रीलंकेत राहणे स्वस्त असल्याने वर्षभर येथे पर्यटकांची मंदियाळी असते.
कोस्टारिका…
जगातील सर्वात सुंदर देशांच्या यादीत कोस्टारिकाचा समावेश होतो. मार्च-एप्रिलमध्येच येथील हॉटेल्स आणि विमान तिकिटांची बुकींग केल्याने मूळ किंमतीत सूटही चांगली मिळते. येथे स्नॉर्कलिंग,सर्फिंग, जेट स्कीइंग,रिव्हर राफ्टींग यासारखे साहसी खेळ एन्जॉय करता येतात. त्याशिवाय हिरवीगार अशी समुद्राची लांबलचक किनारपट्टी हे कोस्टारिकाचे वेगळे वैशिष्टय. खाणे-पिणेही स्वस्त.यामुळे या वर्षी कोस्टारिकाच्या टूरचा विचार करायला हरकत नाही.
झिम्बाब्वे..
निसर्गसौंदर्याने नटलेल्या या देशाला भेट देण्यासारखा दुसरा आनंद नाही. स्वस्त विमान यात्रा,परवडणारे हॉटेल्स, माटोपोस नॅशनल पार्क, मुटारे टाऊन, चिनोहई गुंफा आणि इतर जंगल सफारींचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी झिम्बाब्वेला जायलाच हव.
इंडोनेशिया..
बाली हे हिंदुस्थानींच आवडत पर्यटनस्थळ आहे. जगातील सर्वात मोठे द्विप असलेल्या इंडोनेशियात राहणं-खाणं स्वस्त आहे. यामुळे बजेटची काळजी करण्याची गरज नाही. निळाशार समुद्रकिनारा हे इकडचे मुख्य आकर्षणकेंद्र आहे.
आपली प्रतिक्रिया द्या