LPG गॅस ते बँकिंग सेवा, 1 नोव्हेंबर पासून ‘या’ नियमात होणार बदल; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

lpg-gas

होय, 1 नोव्हेंबर, 2020 पासून अनेक नियमात बदल होणार आहे. नवीन महिन्यात एलपीजी गॅस बुकिंग आणि डिलिव्हरी संबंधी नियमात बदल होत आहे. तसेच बँकिंग सेवा आणि रेल्वे सेवेत देखील काही बदल होणार असून आपल्याला याची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. जाणून घेऊया…

इंडेन गॅस ग्राहकांसाठी महत्वाचे

तुम्ही जर इंडेन गॅसचे ग्राहक असाल तर बुकिंगसाठी आता नवीन नंबरचा वापर करावा लागणार आहे. इंडियन ऑइलने इंडेन गॅसचा बुकिंग नंबर बदलला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 7718955555 या नवीन नंबरवर फोन करावा लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.

होम डिलिव्हरी होणार हायटेक

1 नोव्हेंबर पासून एलपीजी गॅस सिलिंडर ची होम डिलिव्हरी अधिक हायटेक होणार आहे. गॅस बुकिंग नंतर ग्राहकांना मोबाईलवर आता एक OTP (ओटीपी) पाठवण्यात येणार आहे. सिलिंडरची डिलिव्हरी करण्यासाठी वेंडर घरी येईल तेव्हा त्याला ओटीपी नंबर दाखवावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला सिलिंडर मिळणार आहे.

एलपीजी गॅसची किंमत ठरणार

1 नोव्हेंबर 2020 ला एलपीजी गॅसची नवीन किंमत जारी होईल. ऑक्टोबर महिन्यात एलपीजी गॅसच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आला नव्हता, तर कमर्शियल गॅसच्या किमती वाढल्या होत्या.

रेल्वेचे वेळापत्रक बदलणार

भारतीय रेल्वे संपूर्ण देशातील रेल्वेचे वेळापत्रक बदलणार आहे. याआधी 1 ऑक्टोबरला हा बदल होणार होता, मात्र तारीख पुढे ढकलण्यात आली होतो. सध्या अनेक रेल्वे बंद असून फक्त विशेष ट्रेन सुरू आहेत. त्यामुळे सर्व ट्रेन सुरळीत सुरू होण्यापूर्वी रेल्वे वेळापत्रक बदल करणार आहे.

‘बँक ऑफ बडोदा’ करणार बदल

बँक ऑफ बडोदा 1 नोव्हेंबर पासून काही नियमात बदल करणार आहे. करंट अकाउंट, ओवरड्राफ्ट अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट, सेविंग अकाउंट आणि अन्य अकाउंटमध्ये कॅश जमा व काढण्याशी, व चेक सेवे संदर्भातील सेवा शुल्काबाबत हे बदल असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या