अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

25
lpg-gas

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गरीबातील गरीब आणि सामान्यांतील सामान्य लोकांच्या हितासाठी काम करणार असे आश्वासन दिले जात असले तरी मोदी सरकारच्या कार्यकाळात पुन्हा एकदा अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावेळी अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने गॅस सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढही त्याचाच एक भाग असून दर महिन्याला गॅस सिलेंडरचे दर वाढणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर चार रुपयांनी वाढ करावी असे निर्देश सरकारने दिल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी लोकसभेत दिली होती. मार्च २०१८ पर्यंत एलपीजी गॅसवरील अनुदान बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर जुलै २०१६ पासून आतापर्यंत १० वेळा गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या