उपचार करण्याच्या नावाखाली बाबा चालवत होता सेक्स रॅकेट; स्थानिकांनी रंगेहात पकडले

अनेक बाबा-बुवांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या काही घटना उघड झाल्या आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही  एका सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाबाला अटक करण्यात आली आहे. हा बाबा उपचार करण्याच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता. स्थानिकांना बाबाचा संशय आल्यानंतर त्यांनी बाबाला रंगहात पकडले. त्यानंतर पोलिसांनी या बाबाला अटक केली आहे.

लखनौमध्ये असलेल्या या बाबाला कालेबाबा म्हणून ओळखत होते. तो शरीरावरील पांढरे डाग, व्रण यावर उपचार करायचा. तसेच निपुत्रिक महिलांवरही उपचार करत असल्याचे सांगण्यात येत होते. तो उपचार करण्याच्या नावाखाली महिलांना एका खोलीत न्यायचा आणि तिथे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बाबाकडे अनेक महिला आणि पुरुष येत असल्याने स्थानिकांचा संशय वाढत होता. या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे स्थानिकांना समजले. त्यानंतर त्यांनी अचानक घटनास्थळी पोहचत बाबाला त्याच्या सहकाऱ्यासह एक महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगहात पकडले. त्यावेळी काहीजणांनी घटनेचा व्हिडीओ बनवत तोव्हायरल केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बाबाला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. त्याच्याविरोधात कलम 354, 354 B, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अधिकत तपास करण्यात येत आहे. सतर्क असलेल्या स्थानिकांमुळे हे सेक्स रॅकेट उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कालेबाबाकडे महिला आणि पुरुष जाताना नेहमी दिसायचे. तो सफेद डाग आणि इतर व्रणांवर उपचार करतो, असे सांगण्यात येत होते. मात्र,दररोज येणाऱ्या महिला आणि पुरुषांमुळे त्या ठिकाणी संशयास्पद हालाचाली सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे परिसराच्या सुरक्षेच्या हेतूने आम्ही घटनास्थळी अचानक पोहचल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या