मुस्लिमांच्या हत्या झाल्या तर देशाचे तुकडे करू!

43

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जर देशात मुस्लिमांच्या हत्या सुरूच राहिल्या तर देशाचे दोन तुकडे करू, असे वादग्रस्त वक्तव्य पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे नेते मुझप्फर हुसैन बैग यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटणार आहे. पीडीपीच्या २८ व्या स्थापनेच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती देखील उपस्थित होत्या.

‘देशात गायी-म्हशींवरून जर मुस्लिमांच्या हत्या होणार असतील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. या देशात १९४७ साली फाळणी झालेली आहे. जर या हत्या थांबल्या नाहीत तर पुन्हा देशाची फाळणी होईल’, असे वक्तव्य मुझप्फर हुसैन बैग यांनी केले आहे. मुझप्फर हुसैन बैग हे बारामुल्ला कुपवाडा मतदार संघाचे खासदार आहेत.

 

SUMMARY :  PDP leader Muzaffar Hussain Baig says Lynching in the name of cow could lead to another partition

आपली प्रतिक्रिया द्या