सिंगापूर चित्रपट महोत्सवात ‘माई घाट’ सर्वोत्कृष्ट

247


एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढय़ाची हेलावणारी कथा असलेल्या ‘माई घाट – क्राइम नं. 103/2005’ हा मराठी चित्रपट ‘सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात’ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही.

आठ देशांतील चौदा चित्रपटांतून ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’,  ‘संकलन’ व  ‘छायाचित्रण’ असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्त्वाचे पुरस्कार ‘माई घाट’ने पटकावले आहेत. महिला सबळीकरणाची कथा सांगणारा हा चित्रपट युवा निर्माती मोहिनी रामचंद्र गुप्ता यांच्या  अलकेमी व्हिजन वर्क्सची निर्मिती आहे. अनंत महादेवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या