हिंदुस्थानी बनावटीची मर्सिडीझ कार दाखल

25

सामना ऑनलाईन । मुंबई

लक्झरी कारच्या निर्मितीतलं एक अग्रेसर नाव म्हणजे जर्मनीतलं मर्सिडिझ. मात्र, याच मर्सिडीझने संपूर्ण भारतीय बनावटीची ई क्लास श्रेणीतली नवी कोरी गाडी आज बाजारात दाखल केली. सुमारे ५६.१५ लाख रुपये किमतीची ही गाडी प्रतिस्पर्धी बीएमडब्ल्यू, जग्वार, ऑडी आणि व्होल्वोला तगडी टक्कर देईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. मर्सिडिझसाठी भारतामधले प्रमुख स्पर्धक ऑडी ए-६, बीएमडब्ल्यू ५ सीरीज, व्होल्वो एस-९० आणि जॅग्वार एक्सएफ प्लस या गाड्या आहेत.

हिंदुस्थानी ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. पेट्रोल इंजिन २.० तर डिझेल ३.० लीटर क्षमतेचं असणार आहे. शून्य ते १०० किमीपर्यंतचा वेगाचा टप्पा डिझेल इंजिनासाठी ६.६ सेकंदांत तर पेट्रोल इंजिनासाठी ८.५ सेकंदात ही गाडी पार करत असल्याचं या गाडीच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे.

हे आहेत मर्सिडीझ ई क्लास २०१७चे खास फीचर्स
– संपूर्ण एलईडी लॅम्प, एअर सस्पेंन्शन
– चारही सीट इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट करण्याची क्षमता
– ३ स्पीकर असलेली साउंड सिस्टिम
– पॅनोरॅमिक सनरूफ
– स्टीअरिंग व्हीलवर स्पर्शानं चालणारे कंट्रोल्स

आपली प्रतिक्रिया द्या