आमदार तानाजीराव सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, शिवसैनिकांमध्ये जल्लोष

75

सामना प्रतिनिधी । माढा

माढयाचे सुपूत्र शिवसेनेचे उपनेते विधानपरिषदचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि माढा येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत एकच जल्लोष केला. आमदार तानाजी सावंत यांच्या रूपाने राज्य मंत्री मंडळाच्या समावेशा मुळे पहिल्यांदाच माढ्याला संधी मिळाली आहे.

वाकाव ता माढा या मूळ गावी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी प्रथम काही दिवस भारती विद्यापीठ येथे सेवा केली. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला. तर शिवसेनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात शिवजल क्रांती घडवून आणली.

वाकाव या छोट्या गावी शेतकरी कुटुंबातील जन्म ते प्राध्यापक ,जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा , शिवसेना विधानपरिषद आमदार, शिवसेना उपनेते,ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

आमदार तानाजी राव सावंत यांच्या रूपाने माढा तालुक्याला राज्य मंत्री मंडळात प्रथमच संधी मिळाली असल्याने त्यांच्या मूळ गावी वाकाव येथे व माढा येथील जयवंत मल्टिस्टेट कार्यालयासमोर तालुक्यातील शिवसैनिकानी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या