अभिनेत्री मधुरा देशपांडे अडकली लग्नाच्या बेडीत

92

सामना ऑनलाईन । मुंबई

‘कन्यादान” या गाजलेल्या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मधुरा देशपांडे ही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. आशय गोखले या तरूणासोबत मधुराचा नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. त्यां दोघांचा ५ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.

आशय आर्कीटेक्ट असून त्याची ‘रिबन्स अॅण्ड बलून्स’मध्येही पार्टनरशिप म्हणुनही कार्यरत आहे. आशय आणि मधुरा हे गेली अनेक वर्षे एकमेकांना चांगले ओळखत असून ते एकमेकांचे फॅमिली फ्रेन्ड्स आहेत.

 

madhura-deshpande

“आशय आणि मी एकमेकांना खूप चांगले ओळखतो. आमचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळा असला तरी आम्ही एकमेकांना पुरक आहोत असे मला जाणवले आणि मी लग्नाचा निर्णय घेतला. आशयची फॅमिलीही माझ्या करिअरला प्राधान्य देते त्यामुळे मी खुप समाधानी आहे.” असे मधुराने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे,

मधुराने आतापर्यंत ‘कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’यांसारख्या मालिकांत काम केले आहे. मधुरा काही नाटकातही काम करतेय.

आपली प्रतिक्रिया द्या