My फिटनेस Funda : सातत्य महत्त्वाचे

174

>> मधुरा पेडणेकर, खो-खोपटू

 • फिटनेस म्हणजे : शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी केला जाणारा व्यायाम.
 • खो-खो की आरोग्य? : आरोग्य. ते चांगले असेल तर खेळ चांगला होईल.
 • डाएट की जीवनशैली? : डाएट. तो चांगला असेल तर आपली जीवनशैली  सुरळीत राहील.
 • सामान्य माणसासाठी फिटनेस : सकाळी चालणे, धावणे.
 • व्यायाम कसा करावा? : सकाळी चालून आल्यानंतर योगा करावा. संध्याकाळी थोडा व्यायाम करावा. व्यायामात सातत्य असायला हवे. जिमला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी तरी व्यायाम करावा.
 • व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता? : दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे. खेळाच्या दृष्टीने मला व्यायामाबरोबर डाएटकडे लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. खेळासाठी व्यायाम आणि चांगला आहार दोन्ही अत्यावश्यक आहे.
 • खो-खो म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा? : आरोग्य. ते चांगले असेल तर स्पर्धा चांगली खेळू शकतो आणि चांगल्या खेळीतून आपली कामगिरी दिसते.
 • दिवसातून पाणी किती प्यावे? : मी दोन ते अडीच लिटर पाणी पिते. सरावाच्या वेळी जास्त पिते.
 • व्यायामाला किती वेळ देता? : दोन तास व्यायामासाठी असतात.
 • जिमला जायला न मिळाल्यास काय करता? : अशावेळी घरीच व्यायाम करते. पुशअप्स, पुलअप्स मारते.
 • बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : बाहेर गेल्यावर डाएट बॅग सोबत ठेवते. सुका मेवा खाते.
 • कोणता पदार्थ नियमित खाता? : दूध, अंडी, फळं.
 • फिटनेससाठी कोणत्या गोष्टींचा त्याग केलास? : तेलकट पदार्थ.
 • फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : स्पर्धेदरम्यान अन्य खेळाडू कसे खेळतात त्याचे निरीक्षण करते. प्रशिक्षक जे बदल सांगतात ते बदल खेळात करते आणि सरावात सातत्य ठेवते.
 • फिटनेस मंत्र : नियमित व्यायाम,  चांगला डाएट, पुरेशी झोप आणि खेळावर एकाग्रता.
आपली प्रतिक्रिया द्या