नेनेंचा पिझ्झा पाहून माधुरीची ‘धकधक’ वाढली

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत आणि डॉ. श्रीराम नेने यांची जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकतंच डॉ. नेने यांनी कुकिंग करून माधुरीला इप्रेस केलं आहे. इन्स्टाग्रामवर माधुरीला पिझ्झा भरवतानाचा एक फोटो डॉ. नेने यांनी पोस्ट केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पिझ्झा खास त्यांनी घरच्या घरी खास माधुरीसाठी तयार केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘होममेड पिझ्झा…लवकरच माझ्या युटय़ूब चॅनेलवर… तुमची आवडती डिश कोणती आहे.’ त्यांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून तुमच्या जोडीला कुणाची दृष्ट न लागो, अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या