धकधक गर्ल माधुरीची क्रेझ कायम, इंस्टाग्रामवरचा फोटो व्हायरल

धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने ची बॉलीवूडच्या चाहत्यांवर भूरळ कायम आहे. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या माधुरीची चर्चा आजही कायम आहे. माधुरी सध्या मुंबईत आहे. ती आपल्या चाहत्यांना अॅक्टिंग आणि नृत्याचे धडे देत असते. मात्र सध्या देशभरात कोरोनाचा प्रभाव वाढला असून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा वेळी Covid19 च्या नियमांचं पालन करत स्वत:च्या आरोग्यासाठी नागरिकांनी ‘योगासन’ करणं आवश्यक आवश्यक आहे. माधुरीनं देखील घरातच योगासन करतानाचा फोटो आपल्या सोशल हँडलवर प्रसिद्ध केला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

आपल्या हँडलवरून हा फोटो शेअर करताना माधुरीनं एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘योगासन करताना आपली समझ देखील वाढवली पाहिजे.’ या फोटोत माधुरीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आणि संपूर्ण शरीर दोन हातांवर बॅलन्स केल्याचं दिसत आहे.

माधुरीच्या या ‘योगा’ पोझिशनवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका महिला युझरने म्हटलं आहे की तिला माधुरी सारखं दिसायचं आहे. एकाने लिहिलं आहे माधुरी मॅडम अगदी सुंदर दिसत आहेत. तर कुणी लिहिलं आहे ‘शानदार’. बॉलीवूडमध्ये आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अनेक नावांची भर पडली आहे. असं असलं तरी माधुरीची क्रेझ अजूनही कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या