माधुरीचे गाणे सोशल मीडियावर हिट!

3232

अभिनयासह आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने आता आपल्या गोड आवाजाने देखील चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. कोरोना वॉरियर्सना सलाम करण्यासाठी माधुरीने गायलेले कॅण्डल हे सिंगल सोशल मीडियावर हिट झाले असून त्याला अल्पावधीत लाखो लाईक्स मिळाले आहे.

नुकताच माधुरीने आपला 53 वा वाढदिवस साजरा केला त्यावेळी आपल्या या सिंगलबाबत तिने चाहत्यांना कल्पना दिली होती. अखेर शनिवारी हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. तिचे हे गाणे इंग्रजीमध्ये असले तरी एखाद्या प्रोफेशनल गायकाप्रमाणे तिने ते गायले आहे. हे गाणे सोशल मीडियावर धडकताच अवघ्या तासाभरात त्याला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एकंदरीत माधुरीच्या अभिनयासह तिच्या आवाजाने देखील प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या