मध्य प्रदेशमध्ये एका अग्नीवीर जवानाने ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातला आहे. या दरोड्यात त्याने 50 लाख रुपयांहूनचा अधिक मुद्देमाल लांबवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या जवानासोबत त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
भोपाळमध्ये एका ज्वेलर्सवर दोन दरोडेखोरांनी बंदुकीच्या जोरावर दरोडा घातला. या दरोड्यात दोघांनी 50 लाख रुपयांहूनचा अधिक माल लांबवला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि चोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली. चोर सापडत नाही म्हणून पोलिसांनी या दरोडेखोरांवर 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. काही दिवसांनी पोलिसांनी या दरोडेखोरांना शोधून त्यांना अटक केली.
पोलिसांनी या चोरांची चौकशी केली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. चोरी करणारा आरोपी हा अग्नीवीर जवान होता. आरोपीचे नाव मोहित सिंह बघेल आणि आकाश राय आहे. मोहित सिंह हा अग्नीवीर जवान असून त्याची पोस्टिंग सध्या पठाणकोटमध्ये आहे. आकाश राय हा मोहित सिंहच्या बहिणीचा पती आहे. आकाश राय हा कर्जबाजारी झाला होता. त्याला पैश्यांची गरज होती. म्हणूनच या दोघांनी दरोडा टाकायचा ठरवला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू ठेवली आहे.