‘काही न्यायाधीश मोबाइलमध्ये व्यस्त राहतात’, वकिलींनी सरन्यायाधीशांकडे केली तक्रार

मध्य प्रदेश बार कौन्सिलने (MP Bar Council) देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा (Chief Justice NV Ramana) यांना विनंती केली आहे की राज्यातील जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसाठी आचारसंहिता तयार करावी, कारण वकिलांनी तक्रार केली आहे की सुनावणीच्या वेळीही काही न्यायाधीश मोबाइल फोनला चिकटून राहतात आणि आणि वेळेचे पालन करत नाही.

स्टेट बार कौन्सिल ऑफ मध्य प्रदेश (SBCMP) ने सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. बार कौन्सिलचे अध्यक्ष शैलेंद्र वर्मा यांनी यावृत्ताला दुजोरा दिला.

SBCMP ही एक वैधानिक संस्था आहे, जी कायद्यांच्या आधारे होणाऱ्या यु्क्तीवादाच्या सरावासाठी परवाने जारी करते आणि गैरवर्तनासाठी वकिलांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे.

बार कौन्सिलचे अध्यक्ष शैलेंद्र वर्मा म्हणाले, “एसबीसीएमपीने सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा यांना पत्र लिहून राज्यातील जिल्हा न्यायालयांसाठी आचारसंहिता लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.”

ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे जिल्हा न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजामुळे नाराज आहेत. मध्य प्रदेश राज्य बार कौन्सिलला अनेक बार असोसिएशनकडून पत्रे प्राप्त झाली आहेत. राज्यभरात, ज्यामध्ये काही न्यायिक अधिकाऱ्यांची वर्तणूक आणि न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत वेळापत्रकाचे पालन न केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.”

ते म्हणाले, “न्यायालयीन कामकाजादरम्यान आणि कोर्टात बसताना काही न्यायिक अधिकार्‍यांकडून मोबाईल फोन वापरणे आणि सोशल मीडियावर सर्फिंग करणे यावर बंदी घातली पाहिजे.”

MP Bar Council urges CJI to frame code of conduct for district judges