मध्य प्रदेश: भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट, ६ जखमी

31

सामना ऑनलाईन । शाजापूर

भोपाळ-उज्जैन पॅसेंजर मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यातून जात असताना गाडीच्या एका डब्यात स्फोट झाला. या स्फोटाने गाडीच्या तीन डब्यांचे नुकसान झाले. स्फोट होताच गाडी थांबवण्यात आली. अनेक प्रवाशांनी घाबरुन गाडीतून उडी मारली. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटामुळे सहा प्रवासी जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. य प्रकरणी तपास सुरू आहे.

पॅसेंजरच्या सामान्य डब्यात (जनरल कोच) सकाळी ९.३० ते १० दरम्यान दोन स्फोट झाले. स्फोटात जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या