मध्य प्रदेश सरकारकडून अखेर नसबंदीचे वादग्रस्त परिपत्रक मागे

297

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने अखेर आरोग्य मंत्रालयाचे वादग्रस्त नसबंदीच्या आदेशाचे परिपत्रक आज मागे घेतले आहे. नसबंदी परिपत्रकावरून वाद वाढत असल्याचे पाहून आरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांनी आदेश रद्द करीत असल्याची आज घोषणा केली.

राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या (एनएचएम) राज्य युनिटने नसबंदीबाबत 11 फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक जारी केले होते. यानुसार बहुउद्देशीय पुरुष आरोग्य कर्मचाऱयांनी (एमपीएचडब्ल्यूएस) 31 मार्चअखेर किमान एक पुरुष नसबंदी प्रकरणाचे टार्गेट पूर्ण करावे, असे बजावले होते. जर टार्गेट पूर्ण केले नाही, तर कर्मचाऱयांचे वेतन रोखण्यात येईल आणि त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाईल, असे पत्रकात स्पष्ट केले होते. आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी हे वादग्रस्त परिपत्रक रद्द करण्याची घोषणा आज केली.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 नुसार मध्य प्रदेशात केवळ 0.5 टक्के पुरुषांनी नसबंदी शस्त्र्ाक्रिया करून घेतली आहे. त्यानंतर एनएचएनच्या संचालकांनी परिपत्रकाद्वारे ‘एमपीएचडब्ल्यूएस’नी जिह्यातील नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात किमान 5 ते 10 जणांना घेऊन यावे, असे बजावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या