मध्यप्रदेशात पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रापेक्षाही स्वस्त

24

सामना ऑनलाईन । भोपाळ

इंधनांच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी मध्यप्रदेश सरकारतर्फे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट घटवला आहे. डिझेलवर ५ टक्के तर पेट्रोलवर ३ टक्के व्हॅट घटवला असून याची माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. व्हॅट घटवल्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये डीझेल ६३.३७ ऐवजी ५९.३७ रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. तर पेट्रोल ७४.८३ वरून ७३.१३ रुपये प्रतिलीटर इतकं कमी झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या तक्रारीवरून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात आणि महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशमध्येही इंधनांवरचा टॅक्स घटवण्यात आला आहे. पण, मध्यप्रदेशच्या तुलनेने महाराष्ट्रात इंधन महागच असून आजघडीला महाराष्ट्रात डिझेल ५९.५६ तर पेट्रोल ७५.५५ रुपये प्रतिलीटर इतक्या किमतीला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या