आईच्या श्राद्धासाठी 1500 लोकांना जेवू घालणारे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित

2611

आईच्या श्राद्धासाठी 1500 लोकांना जेवू घालणाऱ्या एका दुबईतून परतलेल्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यात समोर आली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.

कामानिमित्त दुबईला राहणारी सदर व्यक्ती त्याच्या आईच्या श्राद्धासाठी 17 मार्चला हिंदुस्थानात परतली होती. 20 मार्चला त्याच्या आईचे श्राद्ध होते व त्या कार्यक्रमात तब्बल 1500 माणसं जेवली होती. त्यानंतर 25 मार्चला त्याच्यात कोरोनाची लक्षण दिसू लागली. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर 29 मार्चला तो रुग्णालयात गेला तेथे त्याची कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याने त्याला लगेच विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील 11 जणांना विलगीकरणात ठेवले होते. या बाराही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांविषयी पोलिसांनी चौकशी केली असता. त्याने 20 मार्चला एक कार्यक्रम आयोजित केला होता व त्या कार्यक्रमात 1500लोकं जेवली होती असे सांगितले. सध्या त्याच्या निकटवर्तीय 23 जणांना क्वारंटाईन केले असून त्यांचे नमुने डॉक्टरांनी तपासणीसाठी पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या