‘असे’ मास्क वापराल तर 100 रुपये दंड पडणार

2049
n-95 mask

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एन-95 वॉल्व्ह मास्कचा वापर (Particular With Valved Respirator) आणि इतर कोणत्याही वॉल्व्हयुक्त मास्कचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. असे मास्क घालणाऱ्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मनीषसिंग यांनी फौजदारी दंड संहिता कलम 144 अन्वये यासंदर्भात एक आदेश जारी केला आणि सांगितले की, आरोग्य कर्मचारी वगळता इतरांना हे निर्बंध कायम राहील.

या आदेशाचे उल्लंघन (उदा. एन-95 वाल्व्ह मास्क आणि इतर कोणत्याही झडपांचा मास्क घातल्यास) स्पॉट फाईन अंतर्गत प्रति व्यक्ती 100 रुपये दंड आकारला जाईल. इंदूर शहरातील महानगरपालिकेचे अधिकृत अधिकारी आणि ग्रामीण भागातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा पंचायतीने नामनिर्देशित व्यक्तींना स्पॉट फाईन गोळा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन भादंविच्या कलम -188 अन्वये दंडनीय गुन्हा प्रकारात येईल. उर्वरित आदेश आणि वेळोवेळी देण्यात येणारी सूट / निर्बंध लागू राहतील.

गेल्या महिन्यात केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये छिद्रयुक्त एन- 95 मास्क वापरण्यावर प्रतिबंध करण्यात आला होता. अशा प्रकारचा मास्क विषाणूचा प्रसार थांबवू शकत नव्हता आणि कोविड -19 साथीचा रोग रोखण्याण्यासाठीच्या उपयांच्याविरुद्ध तो होता.

आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की अधिकृत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागी लोक एन-95 मास्कचा “अयोग्य वापर” करतात, हे उघडकीस आले आहे, विशेषत: त्या छिद्रयुक्त मास्क कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास उपयुक्त ठरत नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या