रील्समध्ये सोने दाखवताच घरातून 10 लाख चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात किती सोने आहे, असे रील्समध्ये दाखवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. रीलमध्ये दाखवलेल्या 10 लाखांच्या सोन्यावर चोरटय़ांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली आहे. ही महिला यूटय़ुबर असून तिने रील्समध्ये घरातील दागिने आणि पैसे दाखवले होते.

शिवपुरी जिल्ह्यातील मोहानी गावात ही महिला यूटय़ुबर आहे. तिने इन्स्टाग्रामवर रील बनवताना सोने आणि चांदीच्या वस्तू दाखवल्या होत्या. या रीलनंतर चोरटय़ांनी रात्री घरात प्रवेश करत महिलेला व कुटुंबाला एका खोलीत काsंडून ठेवले आणि त्यानंतर घरातील सोने आणि रोकड लंपास केली.