मेहुणीसोबत प्रेमसंबंध, सासरच्या माणसांनी काढली नग्न धिंड

6411

एका तरुणाला आपल्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील अलिराजपूर येथील आहे. येथील एका तरुणाचे आपल्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती त्याच्या सासरच्या माणसांना कळताच त्यांनी या तरुणाला चोप देत गावात त्याची नग्न धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सासरच्या 10 लोकांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण पेशाने मजूर असून तो आपल्या पत्नी आणि मेहुणीसोबत काही दिवसाआधी मजुरीसाठी गुजरातला गेला होता. तिथेच त्याचे आपल्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. गुजरातहून परत आल्यानंतर या दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती त्याच्या सासरच्या माणसाला मिळाली. यानंतर रागावलेल्या सासरच्या माणसांनी आणि गावातील काही लोकांनी या तरुणाला मारहाण करत गावात त्याची नग्न धिंड काढली. या घटनेच्या वेळी उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी याची दाखल घेत संबंधित तरुणाच्या सासरच्या माणसांवर गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या