
मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथे एका 25 वर्षीय पत्रकाराला काही तरुणांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांनी त्या पत्रकाराला झाडाला बांधून मारहाण केली आहे. प्रकाश यादव असे त्या पत्रकाराचे नाव असून तो एका वृत्तसंकेचतस्थळाचा पत्रकार आहे.
1 जानेवारी रोजी प्रकाश यादव हा मोटर सायकलवरून त्याच्या कोटगाव या गावी जात असताना त्याला नारायण यादव या या व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला होता. शिवीगाळ केली. त्यानंतर नारायण यादव व त्याचे भाऊ नरेंद्र यादव आणि आणखी एका व्यक्तीने प्रकाश यादव याला एकट्या गाठून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला एका झाडाला बांधले व अनेकवेळा त्याच्या कानाखाली मारल्या.
या प्रकरणी प्रकाश यादवने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नरेंद्र यादव व नारायण यादव हे फरार आहेत.