18 डिसेंबरपासून साठ्ये महाविद्यालयाचा माध्यम महोत्सव, 60 महाविद्यालयांचा समावेश

532

साठये महाविद्यालयाच्या बॅचलर आँफ मास मिडीयाच्या (बीएमएम) विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱया माध्यम महोत्सवाची नुकतीच घोषणा केली आहे. गेल्या सात वर्षांपासून हा महोत्सव आयोजित केला जात आहे. यंदाही हा महोत्सव 18 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार असून तब्बल 60 महाविद्यालये या महोत्सवात भाग घेणार असून 16 विविध स्पर्धा यावेळी पार पडणार आहेत.

यंदाचा माध्यम महोत्सव हा ’संगीत’ या थीमवर आधारीत असून विविध 16 स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.नुकतीच या महोत्सवाबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात अंकिता मांजरेकर, स्वप्नील गावडे, भगवान बोयाळ या तीन प्रवक्त्यांनी माध्यम महोत्सवाची माहिती दिली.साठये महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेविषयी सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी तुडुंब गर्दी केली होती. बीएमएम विभाग आमचे एक कुटुंब आहे असे यावेळी बीएमएम विभागप्रमुख गजेंद्र देवडा यांनी सांगितले.

टिकटॉकच्या धर्तीवर सादरीकरण
‘जिमसाँग’ आणि ‘टिकटॉक’च्या धर्तीवर आधारीत सादरीकरण अशा अनोख्या स्पर्धांचा महोत्सवात समावेश आहे. महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्य संगीतप्रेमींनाही महोत्सवात सहभागी करून घेता यावे यासाठी काही स्पर्धा या सगळ्यांसाठी खुल्या अशा पद्धतीने ठेवण्याचा मानस असल्याचे प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या