महिलेने केली हनुमान मंदिराला 1 कोटींची संपत्ती दान

मध्यप्रदेशच्या शिवपूरमध्ये शिव कुमारी जादौन नावाच्या शिक्षिकेने छिमछिमा हनुमान मंदिर ट्रस्टला 1 कोटींची संपत्ती दान केली आहे. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना हिस्सा दिल्या नंतर स्वतःचा हिस्सा मंदिराला दान केला. मुलांच्या स्वभावाला कंटाळून त्यांनी संपत्तीचे वाटे केल्याचे बोलले जात आहे. शिव कुमारी जादौन यांनी स्वखुशीने संपत्ती दान केल्याच म्हटलं आहे.

शिव कुमारी जादौन या विजयपूरच्या खितरपाल गावात एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. लहाणपणापासूनच त्यांची देवावर श्रद्धा आहे. त्यांच्या दोन्ही मुलांच्या आणि पतीच्या वागणुकीला कंटाळून त्यांनी त्यांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. शिव कुमारी यांनी लिहिलेल्या मृत्यूपत्रात म्हटले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार मुलांनी न करता मंदिर ट्रस्टने करावा.

शिव कुमारी यांनी लिहिलेल्या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांची सर्व संपत्ती, वीमा पॉलिसी, सोन्या-चांदीचे दागिने, बॅंकेतली बचत, घर, प्लॉट, पगार, ही सर्व मिळून 1 कोटींपेक्षा जास्त संपत्ती दान केली. यासोबतच आपला अंत्यसंस्कार मंदिराच्या ट्रस्टींनी करावा असी इच्छा शिव कुमारी जादौन यांनी व्यक्त केली आहे.